उसेन बोल्ट गेलला म्हणाला 'लूजर'

जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टने चॅम्पियन गाण्यावर डान्स करत वेस्ट इंडिजच्या विजयाचे सेलिब्रेशन केले. 

Updated: Apr 5, 2016, 02:41 PM IST
उसेन बोल्ट गेलला म्हणाला 'लूजर' title=

नवी दिल्ली : जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टने चॅम्पियन गाण्यावर डान्स करत वेस्ट इंडिजच्या विजयाचे सेलिब्रेशन केले. या व्हिडीओत उसेन बोल्ट विजयाच्या आनंदात गाताना तसेच डान्स करताना दिसतोय. तो 'मार्लन इज चॅम्पियन, सैमुअल्स इज चॅम्पियन, कार्लोस इज चॅम्पियन, ब्रावो इज चॅम्पियन, गेल इज चॅम्पियन अँड वेस्ट इंडीज इस चॅम्पियन। असं गाण गातोय.

 

मात्र गाण्याच्या सगळ्यात शेवटी क्रिस गेलचे नाव घेताना क्रिस गेल इज अ लूजर असं म्हटलंय. त्यानंतर कॅमेऱ्याकडे पाहून तो हसतानाही दिसतोय. तो व्हिडीओ पाहून असं वाटतंय की शेवटी त्याने मजेत मजेत गेलला लूजर म्हटलंय 

आयसीसी वर्ल्डकप पूर्वी ड्वायेन ब्राव्होचे चॅम्पियन चॅम्पियन हे गाणं खूप हिट झालंय भारताविरुद्धच्या विजयानंतर वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी त्या गाण्यावर डान्सही केला.