एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा?

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एक जानेवारी 2017ला साखरपुडा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Updated: Dec 29, 2016, 04:14 PM IST
एक जानेवारी 2017ला विराट-अनुष्काचा साखरपुडा? title=

देहराडून : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा एक जानेवारी 2017ला साखरपुडा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून विराट आणि अनुष्का रिलेशनशिपमध्ये आहेत. आता नव्या वर्षी हे दोघं त्यांचं नातं पुढे घेऊन जाणार असल्याचं बोललं जात आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विराट आणि अनुष्का उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत. या दोघांच्या साखरपुड्याला अंबानी आणि बच्चन कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. अमिताभ आणि जया बच्चन हे दोघं या कार्यक्रमासाठी देहराडूनमध्ये दाखल झाल्याची बातमी न्यूज 18 या वेबसाईटनं दिली आहे.

देहराडूनमधल्या नरेंद्रनगर हॉटेलमध्ये विराट आणि अनुष्का सध्या थांबले आहेत. याच हॉटेलमध्ये दोघंही साखरपुडा करणार असल्याची माहिती मिळत आहे. विराट कोहली हा उत्तराखंडचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत या सोहळ्याला उपस्थित राहून राज्याच्या पर्यटनाला चालना देणार असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.