स्मिथला चिडवण्यावर कोहलीचं स्पष्टीकरण

26 जानेवारीला अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यावर विराट कोहलीनं त्याला हातवारे करुन चिडवलं.

Updated: Jan 30, 2016, 03:43 PM IST
स्मिथला चिडवण्यावर कोहलीचं स्पष्टीकरण title=

मेलबर्न: 26 जानेवारीला अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यावर विराट कोहलीनं त्याला हातवारे करुन चिडवलं. बॅटिंगकरत असताना स्मिथ कॉमेंट्री करणाऱ्यांशी बोलत होता, म्हणून कोहलीनं त्याला चिडवलं असा स्मिथचा समज झाला होता. पण त्याला आता खुद्द विराट कोहलीनंच प्रत्युत्तर दिलं आहे.

त्या मॅचवेळी स्मिथ आमच्या बॉलर्सना चिडवत होता, याबाबत मी अंपायरकडे तक्रारही केली, त्यामुळे तो बाद झाल्यानंतर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं, असं विराट म्हणाला आहे. आता ड्रेसिंग रुम मध्ये जाऊन जी बडबड करायची ती कर, असं मी त्याला म्हणाल्याच विराटनं स्पष्टीकरण दिलं आहे. स्मिथ माईकवर बोलत असल्याचं मला माहिती नव्हतं असंही कोहली म्हणाला आहे.

माईकवर बोलत असल्यानं कोहलीनं आपल्याला चिडवल्याचा स्मिथचा समज झाला होता. याबाबत स्मिथनं नाराजीही व्यक्त केली होती. मैदानावर मस्करी चालते पण आऊट झालेल्याला असं चिडवू नये, असं स्मिथ म्हणाला होता. पण कोहलीनं दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे याला आता स्मिथच्या उलट्या बोंबाच म्हणाव्या लागतील.