मॅचनंतर का भावूक झाला विराट ?

जवळपास हारलेली मॅच विराट कोहलीनं जिंकवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोहलीनं भारताला पोहोचवलं.

Updated: Mar 28, 2016, 11:07 PM IST
मॅचनंतर का भावूक झाला विराट ? title=

मुंबई: जवळपास हारलेली मॅच विराट कोहलीनं जिंकवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोहलीनं भारताला पोहोचवलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मॅचमध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनीनं शेवटची फोर मारून भारताचा विजय निश्चित केला, तेव्हा विराट कोहली भावूक झाला. 

त्या क्षणी भावूक व्हायचं कारण विराट कोहलीनं सांगितंल आहे. पहिल्या 10 ओव्हरनंतर आम्ही जवळपास सामना गमावलेलाच होता. पण ही मॅच मी आणि धोनीनं कशी जिंकवली हे मला माहित नाही, असं कोहली म्हणाला आहे. 

धोनीनं जेव्हा फोर मारली तेव्हा मी भावूक झालो, काय प्रतिक्रिया द्यायची हे मला कळत नव्हतं. यासाठीच तुम्ही क्रिकेट खेळता, तुमचे सहकारी जिंकल्यानंतर जल्लोष करतात, यामुळे आनंद होतो, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे.