'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'

आठवड्याभराच्या अनिश्चिततेनंतर टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाने रविवारी मैदानावर सराव केला. ईडन गार्डनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे तसेच भारतीय संघाचे कौतुक केले. 

Updated: Mar 13, 2016, 02:53 PM IST
'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं' title=

कोलकाता : आठवड्याभराच्या अनिश्चिततेनंतर टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाने रविवारी मैदानावर सराव केला. ईडन गार्डनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे तसेच भारतीय संघाचे कौतुक केले. 

भारतात आम्ही नेहमीच क्रिकेट एंजॉय केले आहे. पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळते, असे आफ्रिदी म्हणाला. यावेळी त्याने भारतीय संघाच्या कामगिरीचेही तोंडभरुन कौतुक केले. 

असे खूप कमी देश आहेत जिथे मी क्रिकेट एंजॉय केलंय त्यापैकीच भारत एक आहे. भारत सध्या चांगली कामगिरी करतोय. आशिया कपमध्ये विराट आणि युवराजने आमच्याविरुद्ध चांगले प्रदर्शन केले, असे आफ्रिदीने सांगितले. 

आमचा सरावही चांगला सुरु आहे. भारतात येण्यासाठी आम्ही शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तयार होतो, असेही आफ्रिदी पुढे म्हणाला. आफ्रीदीसोबतच शोएब मलिकनेही भारतीय संघाची स्तुती केली. भारतात आल्यावर खुश आहे. भारतात खूप प्रेम मिळत असल्याचे शोएब म्हणाला.