राष्ट्रगीत सुरू आणि विराट पाहतो कोणाकडे ?

विराट कोहली म्हणजे सध्याच्या भारतीय टीममधील स्टार प्लेअर. त्याची मैदानातील खेळाची स्टाईल आणि मैदानाबाहेरील स्टाईल या दोन्हींची चर्चा नेहमीच होत असते. विराट कोहलीचा असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Mar 12, 2015, 01:56 PM IST
राष्ट्रगीत सुरू आणि विराट पाहतो कोणाकडे ? title=

मुंबई : विराट कोहली म्हणजे सध्याच्या भारतीय टीममधील स्टार प्लेअर. त्याची मैदानातील खेळाची स्टाईल आणि मैदानाबाहेरील स्टाईल या दोन्हींची चर्चा नेहमीच होत असते. विराट कोहलीचा असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
  
मॅचच्या आधी होणाऱ्या राष्ट्रगीतासाठी भारतीय टीमचे सगळे खेळाडू उभे असल्याचा हा फोटो आहे. पण, सर्व खेळाडू ताठ मानेने समोर पाहतांना दिसत आहेत, मात्र विराट तिरकस नजरेने बाजूला ठेवलेल्या वर्ल्ड कप ट्रॉफीकडे पाहताना दिसत आहे. एकंदर विराटचे इरादे काय आहेत हे या फोटोतुन स्पष्ट दिसत आहे. जसा तो खेळतोय त्यावरून वर्ल्ड कप ट्रॉफी परत भारतात आणण्याच त्याने आधीच ठरवलं आहे असंच म्हणावं लागेल. 

यापूर्वी त्याने 2011मध्ये वर्ल्ड कप ही ट्रॉफी विजेता म्हणून उचलली आहे. पण सध्या टीम इंडियाची कामगिरी पाहता विराटला ही ट्रॉफी पुन्हा भारतात परत न्यायची असल्याचे या फोटोमधून दिसून येत आहे. 

अनुष्का शर्मा बरोबरच प्रेम प्रकरण सर्वांनाच ठाऊक आहे. पण त्याचं पहिलं प्रेम भारत आणि भारतासाठी खेळणं  हेच आहे असच म्हणाव लागेल.