...तर भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील

भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत टी-२० वर्ल्डकपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले खरे मात्र अद्यापही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाहीये.

Updated: Mar 24, 2016, 03:46 PM IST
...तर भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील title=

बंगळूरु : भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत टी-२० वर्ल्डकपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले खरे मात्र अद्यापही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाहीये.

या विजयाद्वारे भारताने सेमीफायनलच्या आशा कायम ठेवल्यात मात्र पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया तसेच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. 

या आहेत ३ शक्यता

1. भारत सध्या पॉईंटटेबलमध्ये चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र त्यांचा रनरेट -०.५५ इतका आहे. यापुढील दोन सामने भारतासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान आणि त्यानंतर भारत वि ऑस्ट्रेलिया.

२. शुक्रवारी पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यास त्यांचे भारताइतकेच चार गुण होतील. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत महत्त्वाची असेल. हा सामना बरोबरीत सुटल्यास रनरेटच्या आधारावर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये जाईल. 

३. समजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यास त्यांचेही गुण ४ होतील. तसेच त्यांचा रनरेटही चांगला आहे. त्यांचा सध्याचा रनरेट ०.२५ आहे तर भारताचा -०.५५ इतका आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाकिस्तान जिंकल्यास त्यांचा रनरेटही सुधारेल. दुसरीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोघांसाठी सामना जिंकणे महत्त्वाचे असेल. भारत या सामन्यात जिंकल्यास त्यांच्यासाठी सेमीफायनलेच दरवाजे उघडतील मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला केवळ विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने त्यांना विजय मिळवावा लागेल. ऑस्ट्रेलिया - भारत यांच्यात सामना झाला नाही तर भारताचे ५ गुण होतील. 

४. समजा पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळतील. ऑस्ट्रेलियाचे तीन गुण होतील. त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुकाबला महत्त्वाचा असेल. मात्र भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातही सामना होऊ शकला नाही तर पुन्हा दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. भारताचे यानंतर पाच गुण होतील.

जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून हरल्यास तर त्यांचे चार गुण राहतील. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विजय मिळवला आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांचा पराभव झाल्यास त्यांचेही चार गुण राहतील. तसेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास त्यांचेही ४ गुण होतील. यावेळी रनरेटद्वारे भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल.