आयपीएल ७ : चेन्नईच्या खेळाडूच्या खोलीत रात्रभर तरूणी?

 आयपीएल सामन्यावेळी रंगारग पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये अनेकवेळा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. इंग्रजी वृत्तपत्र ' इंडियन एक्स्प्रेस' ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या सीझनमध्ये एका व्यक्तीच्या जहाजावर प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबच्या खेळाडूंना पार्टी देण्याचे प्रकरण आयसीसीच्या अँटी करप्शनच्या स्कॅनरमध्ये आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूच्या रूममध्ये एका महिलेने रात्र घालविली तसेच शाहरुख खानच्या मित्राने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय केकेआरच्या खेळाडूंना डिनर पार्टीचे आयोजन करण्याचे प्रकरणही चौकशीच्या घेऱ्यात आहे. 

Updated: May 22, 2015, 07:57 PM IST
आयपीएल ७ : चेन्नईच्या खेळाडूच्या खोलीत रात्रभर तरूणी? title=

नवी दिल्ली :  आयपीएल सामन्यावेळी रंगारग पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये अनेकवेळा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. इंग्रजी वृत्तपत्र ' इंडियन एक्स्प्रेस' ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या सीझनमध्ये एका व्यक्तीच्या जहाजावर प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबच्या खेळाडूंना पार्टी देण्याचे प्रकरण आयसीसीच्या अँटी करप्शनच्या स्कॅनरमध्ये आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूच्या रूममध्ये एका महिलेने रात्र घालविली तसेच शाहरुख खानच्या मित्राने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय केकेआरच्या खेळाडूंना डिनर पार्टीचे आयोजन करण्याचे प्रकरणही चौकशीच्या घेऱ्यात आहे. 

स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाची चौकशी सुरू होती त्यावेळी आयपीएल फ्रेंचायझीकडून प्रोटोकॉलच्या उल्लंघनाची ही प्रकरणे समोर आली आहेत. हे सर्व प्रकरण बीसीसीआयच्या अँडी करप्शन सिक्युरिटी यूनिटच्या निदर्शनास आली आहेत. 

गेल्या सीझनमध्ये बीसीसीआयला पाठविलेल्या एका इमेलमध्ये एसीएसयू चीफ रवि स्वानी या प्रकरणात लिस्ट पाठवली होती. यात खेळाडू आणि फ्रेंचायझीच्या मालकांकडून झालेल्या नियम उल्लंघनाचा उल्लेख करण्यात आला होता. या इमेलमध्ये नमूद केले की आयपीएलच्या सीजन ७ मध्ये १६ एप्रिल ते १ जून दरम्यान अनेक वेळा नियमांचे उल्लंघन झाले आहे. विशेष म्हणजे हे तेव्हा झाले जेव्हा सुप्रीम कोर्टात स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी सुरू होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.