श्रीलंकेची फायनलमध्ये धडक, पाकला घरी पाठवलं

Last Updated: Friday, October 5, 2012 - 09:56

www.24taas.com, कोलंबो
यजमान श्रीलंकेने टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. लंकेने पाकवर दिमाखदार १६ रनने विजय मिळवला. आणि फायनलमध्ये प्रवेश केला. त्यांची गाठ आत ऑस्ट्रेलिया किंवा वेस्टइंडीज याच्यांशी पडणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. सुपर एटच्या पहिल्या गटातून श्रीलंकेने फायनलचं तिकीट गाठलं आहे.
श्रीलंकेकडून जयवर्धनेने ४२ रनची खेळी केली २० ओव्हरमध्ये लंकेने १३९ रनपर्यंत मजल मारली तर पाकिस्ताने सात विकेट गमावून फक्त १२७ रनच करू शकले, लंकेकडून हेराथने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या आणि पाकच्या फंलदाजीला चांगलचं खिंडार पाडलं.

ट्वेंटी-20 वर्ल्डकपमध्ये या दोन्ही टीमदरम्यान 2009 चा फायनल झाला होता. पाकने चार वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे लंकेचा वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे.

First Published: Thursday, October 4, 2012 - 22:45
comments powered by Disqus