`आकाश-२` टॅबलेट बाजारात

ज्याची उत्सुकता होती ती आता संपली आहे. `आकाश-२` टॅबलेट बाजारात दाखल झाला आहे. `आकाश` टॅबलेटचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 11, 2012, 04:22 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
ज्याची उत्सुकता होती ती आता संपली आहे. `आकाश-२` टॅबलेट बाजारात दाखल झाला आहे. `आकाश` टॅबलेटचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आले.
शिक्षण दिनाचे औचित्य साधून `आकाश` टॅबलेटचे अपडेटेड लेटेस व्हर्जन आजपासून बाजारात दाखल झाले. पहिल्या `आकाश`मध्ये दोष आढळल्यानंतर हा प्रकल्प सुधारित व्हर्जनसाठी आयआयटीमधील कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड इंजिनिअरिंग विभागाकडे आला होता.
आकाशची किंमतही कमी आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना आकाश टॅबलेट सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर ११३२ रुपयांना मिळणार आहे. मात्र, या टॅबलेटची बाजारातील किंमत २९९९ रुपये असणार आहे.
आकाश-२ मध्ये काय असणार?
- यूट्यूबवरून व्हिडिओ आणि ऍण्ड्रॉईट ऍप्लिकेशन डाऊनलोड करता येणार
- सात इंड स्क्रिन डिस्प्ले, सेंसेटिव स्क्रिनटच
- ऍण्ड्रॉईड ४.० ऑपरेटिंग सिस्टीम
- ७०० मेगाहर्टज कॉन्ट्रॅक्ट प्रोसेसर
- ३२०० एमएएच बॅटरी पॉवर
- वाय-फाय, जीपीआरएस
- एक जीबी रॅम
आयआयटीने काही दिवसांपूर्वी अभियांत्रिकी शाखेत शिक्षकांसाठी आकाशवर ओपन सोर्स ऍप्लिकेशन कंटेंट वापर याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला. या उपक्रमात १० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
आकाश`च्या नव्या व्हर्जनमध्ये ओपन सोर्स ऍप्लिकेशन आणि कंटेंटचा वापर यांचाही समावेश आहे. त्यामुळे १००० शिक्षकांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात येईल, असे मॉडेल विकसित करण्यात आले आहे.
इलेक्ट्रॉ निक्सह, थर्मोडायनामिक्से, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग अशा मूलभूत अभ्यासक्रमांचीही ओळख करून देण्याचा विभागाचा मानस आहे. प्रशिक्षण केंद्रांची संख्या सध्या मर्यादित असली, तरी आगामी सहा महिन्यांत अतिदुर्गम भागांत २०० केंद्रे सुरू केली जातील. तर ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.