प्रेमाने घेतला २८,१४५ जणांचा बळी !

प्रेम ही ईश्वराची देणगी आहे असं म्हटलं जातं...मात्र आजच्या तरुणाईसाठी प्रेम यमदूत बनलंय...हे आम्ही नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झालंय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 23, 2013, 10:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
प्रेम ही ईश्वराची देणगी आहे असं म्हटलं जातं...मात्र आजच्या तरुणाईसाठी प्रेम यमदूत बनलंय...हे आम्ही नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झालंय...
यमदूत बनवलं प्रेम !
प्रेमाने घेतला २८,१४५ जणांचा बळी !
महाराष्ट्रात प्रेमाचे ३२५३ बळी !
प्रेमात धोका दिला म्हणून मृत्यूला कवटाळलं...
प्रेमभंग झाला म्हणून हे जग कायमचं सोडलं...
विरह ठरला मृत्यूचं कारण ...
होय... हे वास्तव असून ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती उघड झालीय...प्रेमप्रकरणातून मृत्यू होण्याचं प्रमाण हे आंध्रप्रदेशात सर्वाधिक असून उत्तरप्रदेश दुस-या क्रमांकावर तर महाराष्ट्र तिस-या स्थानावर आहे..
प्रेमभंग झाल्यामुळे प्रियकर -प्रेयसीने एकतर मृत्यूचा मार्ग पत्करला किंवा तिचा अथवा त्याचा खून करण्यात आला... नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार आंध्रप्रदेशात प्रेमभंग आणि लैंगिक संबंधातून मृत्यू होणा-यांची संख्या देशात सर्वाधिक आहे..
प्रेमा तुझा रंग कसा ?
यमदूत बनलं प्रेम!
आंध्रप्रदेश
४९०१ जणांचा मृत्यू
---------
उत्तरप्रदेश
४२०० जणांचा मृत्यू
-------------
महाराष्ट्र
३२५३ जणांचा मृत्यू
------------
मध्यप्रदेश
२५८९ जणांचा मृत्यू
प्रेमप्रकरण आणि लैंगिक संबंधातून होणा-या मृत्यूविषयी तज्ज्ञांच्या मते. वयाच्या एका टप्प्यावर तरुण तरुणी भावनाविवश होवून कोणताही निर्णय घेतात..त्या निर्णयाच्या व्यवहारीक परिमाणाची त्यांना फिकीर नसते.
समाजाने तरुणाईकडं लक्ष्य दिल्यास प्रेमभंगातून होणा-या मृत्यूच्या प्रमाणावर लगाम लगण्यास मदत होईल असं जाणकारांना वाटतंय. वाढता ताण-तणाव तसेच मानसिक आधार देण्यासाठी कोणी नसल्यामुळे प्रेमभंगानंतर तरुण तरुणी एकेकाकी होतात. शारीरिक संबंधानंतर नातं तुटल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना तयार होते...अशा वेळी समाजाने तरुणाईला समजून घेतलं तरचं प्रेमातून होणा-या मृत्यूवर लगाम लावला येईल असं जाणकारांना वाटतंय़.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.