मुंबई : माहिती आणि फोटोच्या माध्यमातून ग्राहकांना नेहमीच सेवा पुरवणारे गूगल, आता 'बाय ऑन गुगल'द्वारे खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांसमोर ठेवणार आहे.
गुगलने नवीन सेवा पुरवण्याच्या तयारीने ‘परचेसेस ऑन गुगल’ ही नवीन संकल्पना मांडण्यास सुरूवात केली आहे. जगभरात, विशेषत: अमेरिकेत ग्राहक कुठलीही खरेदी करताना, त्या वस्तूची माहिती काढण्यासाठी गुगलचा वापर करतात.
याचाच वापर करून त्या माहिती बरोबर ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी 'बाय ऑन गुगल'ची सेवा देणार आहे. त्या वस्तूची माहिती, वस्तूची जाहिरात, त्याचे रेटींग तसेच जवळच्या कोणत्या दुकानात उपलब्ध आहे ही सर्व माहिती मोबाईलवर येण्यास सुरूवात होईल. ‘परचेसेस ऑन गुगल’ ही त्यापुढील पायरी आहे.
पिंटरेस्ट या वेबसाईटने ‘ऑनलाइन बुलेटिन बोर्ड’या माध्यमातून अमेरिकेतील आयफोन आणि आयपॅड ग्राहकांना उत्पादन खरेदीची सेवा उपलब्ध करून दिली आहे.
‘परचेसेस ऑन गुगल’ही सेवा ग्राहकांच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात यायला अजून थो़डा अवधी आहे. तरी गुगलची लोकप्रियता पाहता, ही सेवा अल्पावधीतचं लोकप्रिय होईल याची आम्हाला खात्री आहे. असे वक्तव्य गुगल शॉपिंग मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष जोनाथन अफेअरनेस यांनी केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.