लाकडी पॅनलच्या मोटोरोला मोटो Xची विक्री सुरू

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, April 23, 2014 - 17:40

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अक्रोडसारखी फिनिश असलेला मोटोरोला मोटो x ची विक्री भारतात सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाकडी बॅक पॅनल असलेल्या स्मार्टफोनची किंमत २५,९९९ रुपये आहे. मोटो x ला भारतात केवळ फिल्पकार्ट विकत आहे.
यापूर्वी सागवान फिनिश असलेल्या लाकडी पॅनलमध्ये मोटो X याच किंमतीत उपलब्ध होता. प्लास्टिक पॅनल असलेला मोटो X २३, ९९९ मध्ये आहे.
भारताच्या बाहेर मोटो X बांबू आणि काळ्या लाकड्याच्या झाडाच्या फिनिशच्या बॅक पॅनलमध्ये विक्रीला आहे.
मोटोX मध्ये 1.7 गीगाहर्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन सीपीयू, 4 जीपीयू कोर, एक नॅचरल लॅग्वेज प्रोसेसर कोर आणि एक कन्टेक्सचुअल कम्प्यूटिंग कोर आहे.
इतर फीचर्समध्ये 4.7 इंच 720p डिस्प्ले, 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल स्टॉरेज, 10 मेगापिक्सल मेन कैमरा आणि 2 मेगा पिक्सल फ्रंट कॅमरा, अँड्रॉइड किटकैट 4.4 ओएस आणि 2200 mAh बॅटरी आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014 - 17:40
comments powered by Disqus