खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी

कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.

Updated: Jul 9, 2015, 07:26 PM IST
खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी title=

मुंबई: कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.

१. आपण एक-दुसऱ्यासोबत जन्मभर सोबत करण्याचे वचन देतो आणि हे केवळ वचन नाही तर ती तुमची इच्छाही असते. आपण कधीही वेगळं न होण्याची.

२. सोबत राहता-राहता आपली एकच टीम होते. आपण आपला प्रत्येक प्रॉब्लेम एकमेकांसोबत शेअर करतो आणि एकमेकांना सल्ला देतो.

३. यामुळं अजिबात फरक पडत नाही की, घड्याळात किती वाजले. सोबत असतांना आपण दोघंच कुठे दूर निघून जातो आणि एकमेकांशी न बोलताही एकमेकांच्या भावना समजू शकतो.

४. आपण कोणतीही रात्र जोडीदाराला गुड नाईट न म्हणता झोपत नाही, कारण हीच बाब आपल्याला जवळ आणते.

५. आपण एकमेकांच्या वस्तू अशाच वापरता जशा त्या तुमच्याच आहे. असं केल्यानं आपल्यातील आपलेपणाची भावना वाढते.

६. आपण दररोज काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या पार्टनरला काही नवं फील करवू शकू.

७. बाहेर जातांना आपल्या दोघांचा हा प्रयत्न असतो की, आपले कपडे एकमेकांना मॅचिंग असतील किंवा एका पॅटर्नचे असतील.

८. पार्टीला, क्लबला जाणं आपली प्राथमिकता नसते. अनेकदा आपल्या मित्रांशी खोटं बोलता जेणेकरून आपण तो वेळ आपल्या पार्टनरसोबत घालवू शकाल.

९. आपण आपल्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचं नाव घेऊन पार्टनरला चिडवता आणि कधी-कधी तू तिच्या/त्याच्या सारखा दिसतो म्हणून प्रेमही करता.

१०. आपल्या दोघांना माहिती असतं की, आपल्या पार्टनरला कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे. आपण न मागता ती वस्तू त्याला देतो.

११. अनेक वेळा आपलं बोलणं होत नाही. मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारची कम्युनिकेशन गॅप वाटत नाही. आपल्या भावना एकमेकांना माहिती असतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.