'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत'

सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात

Updated: Aug 1, 2015, 12:53 PM IST
'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत' title=

वॉशिंग्टन : सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात, असं नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमधून समोर आलंय.

मोबाईल फोनच्या सवयी जाणून घेण्यासाठी सात देशांतील सात हजाराहून अधिक लोकांवर हे सर्वेक्षण केलं गेलं तेव्हा हा धक्कादायक तितकाच हास्यास्पद प्रकार लक्षात आलाय. या सर्वेक्षणात सामील झालेले ६० टक्क्यांहून जास्त लोक स्मार्टफोनला आपल्या जवळ ठेऊन झोपतात. यामध्ये भारतीयांचा वाटा सगळ्यात जास्त म्हणजेच ७४ टक्के आहे तर चीनमध्ये ७० टक्के असून या देशाचा यात दुसरा नंबर लागतो.

'मोटोरोला'द्वारा केलेल्या या सर्वेक्षणात सुमारे ५७ टक्के लोक स्मार्टफोनला शौचालयात घेऊन जातात. ४१ टक्के भारतीयांनी शौचालयात आपण स्मार्टफोन वापरत असल्याचं मान्य केलंय.

जर आग लागली तर आम्ही आधी आमचा स्मार्टफोनला वाचवू, अशी कबूलीही ५४ टक्के लोकांनी या सर्वेक्षणादरम्यान दिलीय.  

भारतातील ४४ टक्के लोक आपल्या स्मार्टफोनबरोबर समाधानी आहे तर फोन महत्त्वाच्या क्षणी दगा देतो असे ८८ टक्के लोकांचं म्हणणं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.