गुड न्यूज: एअर इंडियामध्ये भरतील ८०० पदं

भारतीय विमान कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच ८०० नवीन पदांची भर्ती केली जाणार आहे. ८०० नवीन केबिन क्रूची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला सरकारनं मंजूरी दिल्याची माहिती आहे. 

Updated: Jan 6, 2015, 09:58 AM IST
गुड न्यूज: एअर इंडियामध्ये भरतील ८०० पदं title=

नवी दिल्ली: भारतीय विमान कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच ८०० नवीन पदांची भर्ती केली जाणार आहे. ८०० नवीन केबिन क्रूची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला सरकारनं मंजूरी दिल्याची माहिती आहे. 

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागरी उड्डयन मंत्रालयानं एअर इंडियाच्या ८०० नवे केबिन क्रू सदस्य नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिलीय. त्यांनी सांगितलं कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या सध्या खूप कमी असल्यामुळं हा निर्णय घेतला गेलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.