अॅमेझॉनने स्नॅपडीलला मागे टाकले

अॅमेझॉन इंडियाने स्नॅपडीलला मागे टाकले आहे. ई कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्याच्या आकडेवारीत हे समोर आलं आहे.

Updated: Apr 28, 2016, 07:24 PM IST
अॅमेझॉनने स्नॅपडीलला मागे टाकले title=

बंगळुरु : अॅमेझॉन इंडियाने स्नॅपडीलला मागे टाकले आहे. ई कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील मार्च महिन्याच्या आकडेवारीत हे समोर आलं आहे.

अॅमेझॉन दुसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र फ्लिपकार्टचा पहिला नंबर अजूनही कायम आहे, स्नॅपडिलला मागे टाकल्याने अॅमेझॉन परदेशात वाढत असल्याचं सिद्ध होत आहे.

ऑनलाईन शॉपिंगचा मागील महिन्यातील विचार केला असता. फ्लिपकार्टचा बाजारपेठेत 37 टक्के हिस्सा होता. परंतू मार्च 2015 च्या तुलनेत कंपनीच्या बाजारपेठेतील घट झाली आहे. 
फ्लिपकार्टचा ऑनलाईन बाजारपेठेतील हिस्सा 43 टक्के होता. तर  स्नॅपडीलचा हिस्सा 19 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांवर घसरला आहे. मात्र अॅमेझॉन इंडियाची बाजारपेठेतील हिस्सेदारी गेल्यावर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांवरुन 21 ते 24 टक्क्यावर येऊन पोहोचली आहे.

कंपनीने प्रतिस्पर्ध्यांची 10 टक्के हिस्सेदारी काबीज केली आहे, अशी माहिती एका संशोधन संस्थेच्या अहवालानुसार समोर आली आहे. 

ऑनलाईन किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या महिन्यात दिवसाला 8 ते 9 लाख वस्तूंचे वितरण केले आहे. आता फ्लिपकार्ट, अॅमेझॉन नंतर स्नॅपडीलचा नंबर लागतो. 

फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलला भांडवल उभारण्यास अडचणी येत असल्यामुळे कंपन्यांनी ग्राहकांना सवलती देण्यापासून आधीच आखडता हात घेतला आहे. शिवाय, आता सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांमधील गुंतवणूकीसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. त्यापैकी एक अट म्हणजे कंपनीला एका विक्रेत्याकडून 25 टक्क्यांपेक्षा जास्त मालाची विक्री करता येणार नाही.