एप्रिलच्या सुरुवातीला आयफोन एसई भारतात

अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई अखेर लाँच झालाय. या फोनची किंमत ३९ हजार रुपये असल्याची माहिती अॅपलने दिलीय. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला हा आयफोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. 

Updated: Mar 22, 2016, 01:25 PM IST
एप्रिलच्या सुरुवातीला आयफोन एसई भारतात  title=

सॅन फ्रॅन्सिस्को : अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई अखेर लाँच झालाय. या फोनची किंमत ३९ हजार रुपये असल्याची माहिती अॅपलने दिलीय. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला हा आयफोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. 

चार इंचाची स्क्रीन असलेला आयफोन एसई १६ आणि ६४ जीबी या दोन पर्यायांत उपलब्ध आहे. अॅपलने गेल्या वर्षी लाँच केलेल्या आयफोन ६एस सारखाच हा नवा आयफोन आहे. 

या आयफोनमध्ये आयफोन 6s' अॅपल A9 SoC आणि M9 मोशन कोप्रोसेसर, १२ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर १.२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा , ४के व्हिडीओ सपोर्ट, ब्लूटूथ ४.२, वायफाय आणि एलटीई, टच आयडी फिंगरप्रिंट सेंसॉर हे फीचर्स आहे. याचा लूक आयफोन ५एस सारखा आहे.