खबरदार... कॉलेजमधलं लेक्चर बंक करणे पडेल महागात

Updated: Aug 5, 2014, 11:49 AM IST
खबरदार... कॉलेजमधलं लेक्चर बंक करणे पडेल महागात title=

 

मुंबई : कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कॉलेजमधलं लेक्चर बंक करुन तुम्ही पिक्चरचा किंवा कुणाबरोबर फिरायला जायचा प्लॅन करणार असाल, तर आता ते तुम्हाला महागात पडू शकतं.... आतापर्यंत अनेक जण प्रॉक्झी मारुन लेक्चरला कल्टी मारत होते पण आता तसं करता येणार नाही. त्यासाठी क़ॉलेजनं एक स्मार्ट आयडिया शोधलीय. 

कॉलेजमध्ये क्सालरुमपेक्षा कॉलेज कट्ट्याशीच जवळीक जास्त. एखाद्या लेक्चरला बंक मारायचं आणि कट्टा किंवा कॅण्टीनमध्ये टाईमपास करायचा. हा तमाम तरुण तरुणींचा आवडता प्लॅन. त्याचवेळी क्लासरुममधल्या एखाद्या मित्राला पटवून प्रॉक्झी मारायला लावायची. म्हणजे अटेण्डन्सचाही प्रॉब्लेम नाही. पण आता हे सगळं धोक्यात आलंय.

कारण आता कॉलेजमधल्या अटेण्डन्ससाठी विद्यार्थ्यांना स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. रुईया कॉलेजमध्ये ही पद्धत सुरू होतेय. स्मार्टकार्डसाठी प्रत्येक वर्गाबाहेर रिडर लावण्यात येणार आहेत. या रिडरवर विद्यार्थ्यांना स्मार्ट र्ड स्वाईप करायचं आहे. तसंच कोण विद्यार्थी कुणाचं स्मार्ट कार्ड स्वाईप करतो, त्यासाठी कॅमेराही बसवण्यात येणार आहे

आता अटेण्डन्सचं महत्त्व प्रचंड वाढलंय. लेक्चरला 75 टक्के हजेरी लावा, असा साधासरण हिशोब याआधी होता. पण आता 25 इंटरनल मार्क्सपैकी दर सहा महिन्याला 5 मार्क्स हजेरीचे असणार आहेत. त्याचबरोबर फायनल परीक्षेच्या वेळी हे सगळे मार्क्स गृहीत धरले जाणार आहेत. त्यामुळे आता हजेरीसाठी विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरुय. त्यात एक्स्ट्रा करिकुलम ऍक्टिविटीजमध्ये असणा-या विद्यार्थ्यांचा पुरता गोंधळ झालाय. 

रुईया कॉलेजप्रमाणेच इतर कॉलेजमध्येही लवकरच अशा पद्धतीनं स्मार्टकार्ड हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अटेण्डस गांभीर्यानं घ्यावा लागणार आहे. नाही तर आयुष्यभर क़ॉलेज कट्ट्यावर बसण्याचीच वेळ येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.