एका दिवसांत एक लाख मोटोई3 स्मार्टफोनची विक्री

मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो ई3 पॉवर या स्मार्टफोनने भारतीय बाजारात जबरदस्त एंट्री घेतलीये. विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर एका दिवसांत तब्बल एक लाख स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केलाय. 

Updated: Sep 22, 2016, 06:24 PM IST
एका दिवसांत एक लाख मोटोई3 स्मार्टफोनची विक्री title=

मुंबई : मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो ई3 पॉवर या स्मार्टफोनने भारतीय बाजारात जबरदस्त एंट्री घेतलीये. विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर एका दिवसांत तब्बल एक लाख स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केलाय. 

सोमवारी कंपनीने 7,999 रुपयांत मोटोई3 पॉवर लाँच केला होता. याचे वैशिष्ट्य म्हणजे स्मार्टफोनवर देण्यात आलेले नॅनो कोटिंग. ज्यामुळे हलक्या पावसातही आपण हा स्मार्टफोन वापरु शकतो. 

यातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फास्ट चार्जिंग. यामध्ये 3500 एमएएच बॅटरी देण्यात आलीये. 15 मिनिटे चार्ज करुन तुम्ही 5 तासापर्यंत बॅटरी वापरु शकता असा दावा कंपनीने केलाय.