मृत आजीनं पाठवला आपला ‘सेल्फी’!

 रोमानियामध्ये एका महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, तिच्या मृत आजीनं आपला एक सेल्फी पाठवलाय. 

Updated: Jul 5, 2014, 06:02 PM IST
मृत आजीनं पाठवला आपला ‘सेल्फी’! title=

नवी दिल्ली : रोमानियामध्ये एका महिलेनं केलेल्या दाव्यानुसार, तिच्या मृत आजीनं आपला एक सेल्फी पाठवलाय. 

या महिलेच्या या दाव्यानंतर दक्षिण रोमानियातल्या एका चर्च बाहेर लोकांनी एकच गर्दी केलीय. सगळे जण हा काय प्रकार आहे... हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. 

संबंधित महिलेचं नाव गीना मिहाई असं आहे. ‘डेली मेल’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘जेव्हा मी माझा फोन स्विच्ड ऑन केला तेव्हा मी माझ्या आजीचा चेहरा पाहून पहिल्यांदा घाबरलेच... असं वाटत होतं की तिच्या गळ्यात एक साप लटकतोय आणि फोटो पाहून असं वाटत होतं जसं तो फोटो एखादा छिद्रातून घेतला गेला असावा’. 

मिहाईला असं वाटतंय की तिच्या आजीला तिच्याशी संपर्क साधायचाय आणि त्यासाठी तिची धडपड सुरु आहे. तुझ्या आजीला दुसऱ्या जगात तिच्या कर्मांची शिक्षा दिली जातेय, असं एका ज्योतिषानं मिहाईला सांगितलंय. त्यावर मिहाईनं हा फोटो त्या ज्योतिषाला दाखविली... तेव्हा त्यानं तिला तिनंच केलेल्या काही पापांची शिक्षा मिळतेय, असं म्हटलं. 

मिहाई आणि तिचं संपूर्ण कुटुंब चर्चमध्ये आजीच्या सुटकेसाठी प्रार्थना करतंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.