फेसबुकचं पुन्हा `समथिंग वेन्ट राँग`, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस!

फेसबुक पुन्हा डाऊन झालं... हो हो सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेलं फेसबुक पुन्हा डाऊन झालं. तब्बल अर्ध्यातासासाठी फेसबुकची वेबसाईट आणि फेसबुकचं अॅप्लिकेशन बंद पडलं... आणि नेटीझन्स लगेचच हैराण झाले... त्यांची बेचैनी लगेचच बाहेर पडली इतर सोशल मीडियातून...

Updated: Aug 1, 2014, 11:16 PM IST
फेसबुकचं पुन्हा `समथिंग वेन्ट राँग`, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस! title=

मुंबई : फेसबुक पुन्हा डाऊन झालं... हो हो सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेलं फेसबुक पुन्हा डाऊन झालं. तब्बल अर्ध्यातासासाठी फेसबुकची वेबसाईट आणि फेसबुकचं अॅप्लिकेशन बंद पडलं... आणि नेटीझन्स लगेचच हैराण झाले... त्यांची बेचैनी लगेचच बाहेर पडली इतर सोशल मीडियातून...

फेसबुकवर जवळपास 9.45 पासून एरर येत असल्यानं फेसबूक युझर्स चांगलेच त्रस्त झाले. त्यामुळं फेसबूककरांनी थेट इतर सोशल साईट्सवर नोंदवण्याचा सपाटा सुरु केला. आणि त्यामुळंच ट्विटरवर फेसबुक ट्रेंडिंगमध्ये आलं.

पंधरा मिनिटात ट्विटवर फेसबुकचे तब्बल 27 हजाराच्या आसपास ट्विट्स झाले. फेसबुकवर कधी सुरु होतं याबाबत युझर्स आपली तक्रार नोंदवर होतं. अर्ध्यातासानंतर फेसबुक पुर्ववत सुरू झालं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.