फेसबुकमुळे वाढीस लागते मत्सरतेची भावना...

तुम्हीही फेसबुकचा वापर करत असाल तर थोडं सावधान राहा... कारण, फेसबुकचं हे व्यसन तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तुमच्याविषयी मत्सराची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं... 

Updated: Feb 6, 2015, 04:29 PM IST
फेसबुकमुळे वाढीस लागते मत्सरतेची भावना...  title=

वॉशिंग्टन : तुम्हीही फेसबुकचा वापर करत असाल तर थोडं सावधान राहा... कारण, फेसबुकचं हे व्यसन तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तुमच्याविषयी मत्सराची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं... 

अर्थातच, ही गोष्ट तुम्ही फेसबुकचा वापर कशासाठी आणि किती प्रमाणात करता यावर अवलंबून आहे. मिसौरी युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी एका अभ्यासानंतर ही माहिती दिलीय. 'जर्नल कम्प्युटर इन ह्युमन बिहेवियर'मध्ये हे अध्ययन प्रकाशित करण्यात आलंय.

मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये मत्सराची भावना निर्माण झाल्यामुळे तुम्हाला विविध अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. हा धोका टाळण्यासाठी फेसबुकचा वापर करताना इतर उपभोक्त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांप्रती सतर्क राहायला हवं.

युझर्सनं आपल्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी जोडून राहण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण गोष्टी शेअर करण्यासाठी या सोशल वेबसाईटचा योग्य फायदा केला गेला तर हा वापर मजेशीर राहील, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.