कॅलिफोर्निया : फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नवी घोषणा केली आहे. आता फेसबुकवर डिसलाईक बटन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट किंवा पोस्ट आवडली नाही तर तुम्ही लाईकप्रमाणे हे बटन आता वापरू शकता.
अधिक वाचा : पाहा असं आहे फेसबुकचं हेडक्वार्टर, झुकरबर्गनं टाकला व्हिडिओ
फेसबुकने आपल्या युजर्ससाठी काहीना काही सातत्याने बदल करत असते. तसाच हा नवा बदल केलाय. फेसबुकवर एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओला युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यासाठी 'लाईक' केले जाते. आता, त्याचबरोबर नापसंती व्यक्त करण्यासाठी डिसलाईकचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.
अधिक वाचा : कसं केलं जातं तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक?
मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी ही माहिती दिली. फेसबुक युजर्सकडून डिसलाईकचा पर्याय देण्याची मागणी होत होती. याची फेसबुकने दखल घेतलेय. कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात मार्क झुकेरबर्ग यांनी ही माहिती दिली.
एखाद्या दुःखद घटनेतही युजर्सला फक्त लाईकचाच पर्याय फेसबुकवर उपलब्ध आहे. नागरिकांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे कंपनीने डिसलाईकचा पर्याय आणण्याचा निर्णय घेतलाय, असे झुकेरबर्ग यांनी यावेळी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.