मुंबई : फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून लिंक पाठवली जाते, त्यावर लिंकवर क्लिक करू नका, ही लिंक तुमचा पासवर्ड हॅक करण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेली असते.
एकदा जर या लिंकवर तुम्ही क्लिक केलं आणि तुम्हाला अकाऊंट हॅक होण्याचा संशय आला तर तात्काळ ही लिंक बदला. अशा प्रकारच्या लिंक सहसा अनोळखी लोकांकडून पाठवण्यात येतात.
बनावट फेसबुक प्रोफाईल मुलींच्या नावाने तयार करून, अशा लिंक पाठवल्या जातात, यावर एखाद्या सुंदर मुलीचा फोटो लावण्यात येतो, तेव्हा फोटोकडे दुर्लक्ष करा, तरंच तुमचं अकाऊंट हॅक होण्यापासून वाचू शकेल.
हॅक अकाऊंट कसं परत मिळवाल
हॅक झालेला फेसबूक पासवर्ड परत मिळवायचा, यासाठी खूप वेळ लागतो, अथवा ते अकाऊंट तसेच सोडून दिले जाते. तुम्हाला आम्ही एक सोपा उपाय यावर सांगतोय.
पहिल्यांदा फेसबुकच्या https://www.facebook.com/hacked या लिंकवर जा. येथे एक वाक्य लिहलेलं असेल "Your account has been Compromised".
तेथे तुमचं नाव, ईमेल आणि अकाउंटशी संबंधित विचारलेली माहिती द्या.
अकाऊंटशी संबंधित एका फोन नंबरची माहिती द्या, त्यानंतर तुमचं अकाऊंट सर्च होईल. यानंतर तुमचा पासवर्ड परत मिळवण्याचं काम सुरू होईल. जेव्हा पेज उघडेल तेव्हा आपला संपूर्ण पासवर्ड टाका. जेव्हा तुम्हाला चुकीच्या पासवर्डचा मेसेज येईल, तेव्हा 'रिसेट पासवर्ड'चा पर्याय निवडा. हॅकरने आपला ईमेल बदलला असेल, त्यामुळे त्याईमेलवर तुम्ही माहिती घेऊ शकत नाही.
यानंतर स्क्रीनवर लिहलेलं असेल "No longer have access to these?" वर क्लिक करा
यानंतर तुम्ही तुमचा ईमेल द्या, ज्यावर फेसबुक तुम्हाला लिंक पाठवले, या लिंकवरून तुम्हाला पासवर्ड रिसेट करता येईल.
तुम्हाला जे स्क्रीनवर करण्यासाठी सांगण्यात येत आहे, त्यानुसार २४ तासांच्या आत तुम्हाला पासवर्ड परत मिळणार आहे. जेव्हा तुम्हाला नवा पासवर्ड मिळेल. तुम्ही नवा पासवर्ड रिसेट कराल तेव्हा लक्षात ठेवा, त्यात शब्द, नंबर आणि स्पेशल करेक्टरचा समावेश असावा, यावरून तुमचा पासवर्ड हॅक करणे हॅकरला कठीण होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.