माशांचा मेंदू मानवापेक्षाही तल्लख!

माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 19, 2014, 07:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न
माशांना बुद्धी नसतेच, अशी अनेकांची धारणा असते... त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जखमही समजत नाही, हा आणखी एक असाच ग्रह... पण, आता एका नव्या अभ्यासानुसार, माशांचा मेंदू मानवापेक्षाही अधिक तेज असल्याचं समोर आलंय.
ऑस्ट्रेलियाच्या मॅक्वोयर युनिव्हर्सिटीच्या कुलुम ब्राऊन यांनी लिहिलेल्या एका समीक्षेमध्ये ते म्हणतात, माशांची बुद्धी खूपच तल्लख असते... इतकी की मासे स्वत:ला आणि दुसऱ्या माशांना खूप चांगल्या पद्धतीनं ओळखू शकतात. मासे एकमेकांना सोबत-सहयोगही करतात.
अध्ययनानुसार, मानवांप्रमाणेच मासेही स्वविकसित उपकरणांचा वापर करण्यासाठी सक्षम असतात. आपल्या शोधासाठी बोनी माशांचा अभ्यास करणारे ब्राऊन म्हणतात, माशांचं व्यावहारिक आणि ज्ञानसंबंधी सुधार तसंच त्यांना जाणवणारी जखम किंवा त्रास याविषयाकडे लक्ष वेधतात की, इतर कोणत्याही माकडहाड असणाऱ्या प्राण्याप्रमाणेच माशांनाही संरक्षण दिलं जाण्याची आवश्यकता आहे.
जर्नल अॅनिमल कॉग्निशनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार, माशांच्या आत्तापर्यंत ज्ञात 32,000 प्रजाती आढळल्यात. ही संध्या इतर माकडहाड असणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत खूप मोठी आहे. पण, त्यांच्या संरक्षणाकडे मात्र दूर्लक्ष होतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.