तिशीनंतर लग्न न करण्याला मुलींचे प्राधान्य

हल्लीची पिढी जितकी झपाट्याने बदलतेय तितकेच झपाट्याने त्यांचे विचार बदलतायत. पूर्वी शिक्षणानंतर लगेचच लग्नबंधनात अडकणाऱ्या मुली हल्ली शिक्षणानंतर पहिले प्राधान्य देतात ते करिअरला.

Updated: Aug 24, 2016, 10:04 PM IST
तिशीनंतर लग्न न करण्याला मुलींचे प्राधान्य title=

मुंबई : हल्लीची पिढी जितकी झपाट्याने बदलतेय तितकेच झपाट्याने त्यांचे विचार बदलतायत. पूर्वी शिक्षणानंतर लगेचच लग्नबंधनात अडकणाऱ्या मुली हल्ली शिक्षणानंतर पहिले प्राधान्य देतात ते करिअरला.

सुरुवातीला प्रथम प्राधान्य दिले जाणाऱ्या लग्नाला आता दुय्यम दर्जा दिला जातोय. शिक्षण झाल्यानंतर लग्नापेक्षाही करिअर महत्त्वाचे होऊ लागलेय. त्यामुळे तिशी ओलांडली तरीही लग्न न करण्याला हल्ली मुलींची मोठ्या प्रमाणात पसंती दिसू लागलीये.

यामागे कारणे बरीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नातेसंबंधात कमी होत चाललेला विश्वास. हल्ली प्रेम आणि ब्रेकअप सर्रासपणे होतात. त्यामुळे लग्नानंतर आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती किती विश्वासार्ह असेल याची भिती मुलींना वाटते. त्यामुळे लग्नाचं टेन्शनच नको ना. एकटे जगतोय ते बरंय अस मुली म्हणतात.

त्याचबरोबरचे दुसरे कारण म्हणजे स्वातंत्र्य संपेल याची भिती. एकटे असताना आपल्याला हवे तिथे हवे तेव्हा जाता येते. मात्र लग्नानंतर ही बंधने येतात. ही बंधने मुलींना नकोशी वाटतायत. त्यांना मुक्त जगायचयं यामुळे लग्न नको अस म्हणणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढतंय. हल्लीच्या मुलींच्या मते लग्न हे काही आयुष्याचे ध्येय नाही. आयुष्यात लग्नापेक्षाही अधिक महत्त्वाची ध्येय आहेत. त्यामुळेच लग्न करण्यापेक्षा आयुष्यात नवनवीन गोष्टी अनुभवायला त्यांना आवडतात.