सावधान... गूगल, व्हॉट्सअॅप, फेसबूक करते हेरगिरी

 सायबर सेक्युरीटी फर्म अवास्ट यांनी गूगल, व्हॉट्सअॅप आणि फेसबूक यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप लावला आहे. आपल्या युजर्सवर हेरगिरी करून त्यांचा इंटरेस्ट किंवा आवड जाणून घेऊन त्यानुसार जाहिराती पाठवत असल्याचे आरोपात म्हटले आहे. हे सर्व युजर्सला माहीत असल्याचं कटू सत्य त्यांनी मांडल आहे. 

Updated: Oct 28, 2015, 09:38 PM IST
सावधान... गूगल, व्हॉट्सअॅप, फेसबूक करते हेरगिरी title=

मुंबई :  सायबर सेक्युरीटी फर्म अवास्ट यांनी गूगल, व्हॉट्सअॅप आणि फेसबूक यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप लावला आहे. आपल्या युजर्सवर हेरगिरी करून त्यांचा इंटरेस्ट किंवा आवड जाणून घेऊन त्यानुसार जाहिराती पाठवत असल्याचे आरोपात म्हटले आहे. हे सर्व युजर्सला माहीत असल्याचं कटू सत्य त्यांनी मांडल आहे. 

गूगल ही एक जाहिरात कंपनी आहे. गूगल अॅडवर्ड्सच्या माध्यमातून पैसे कमवते. त्यामुळे गूगल वापरणाऱ्या युजर्सवर हेरगिरी केली जात आहे. त्यांनी एखाद्या गोष्टीचा सर्च केला, त्यानुसार त्यांना जाहिराती पाठविल्या जात आहेत. त्यानुसार ते आपला व्यवसाय वाढवत आहेत. हेच त्यांचे बिझनेस मॉडेल आहे, यात काही चुकीचे नाही असेही अवास्टचे सीईओ व्हिन्सेंट स्टेक्लर यांनी म्हटले आहे. 

व्हॉट्सअॅपही युजर्सचा डाटाची हेरगिरी करत असल्याचे स्टेक्लर यांनी म्हटले आहे. यात व्हॉट्सअॅप हे डाटा रिसिव्ह करते आणि त्यानुसार तुमची आवड लक्षात घेऊन फेसबूकवर जाहिरात येतात, असेही स्टेक्लर यांनी सांगितले. 

गूगलच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये लिहिल्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यात म्हटले आहे की, गूगलच्या सर्व्हीस जसे सर्च, जीमेल आणि मॅप वापरल्यास तुम्हांला त्या संदर्भातील जाहिरातील मिळतील, त्यामुळे त्यांनी गूगलच्या सर्व्हिस फ्री दिल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.