सोशल मीडिया हायलाईट : हेलिकॉप्टरमधून शाळेत जाते ही मुलगी...

सोशल मीडियावर सध्या १८ वर्षांच्या एका मुलीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोफिया अब्राहोविक ही तिच्या राहणीमानासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. 

Updated: Feb 2, 2016, 03:58 PM IST
सोशल मीडिया हायलाईट : हेलिकॉप्टरमधून शाळेत जाते ही मुलगी...  title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या १८ वर्षांच्या एका मुलीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोफिया अब्राहोविक ही तिच्या राहणीमानासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. 

१८ वर्षांची सोफिया हेलिकॉफ्टरमधून शाळेत जाते... यावेळी तिच्यासोबत सतत बॉडगार्ड असतात. ती वेस्ट लंडनच्या गोडोल्फिन अॅन्ड लेटेमर स्कूलमध्ये शिकतेय. या शाळेची वार्षिक फी आहे १५ लाख रुपये. तिची लाईफस्टाईल लग्झरीयस आहे. 

Sofia and Roman
सोफिया आपले वडील रोमन अब्राहोविक यांच्यासोबत

सोफिया ही रशियन बिलेनिअर आणि फुटबॉल क्लब चेल्सी एफसीचा मालक रोमन अब्राहोविक याची मुलगी आहे. चेल्सी आपल्या मुलीला जगातील सगळ्या सोई-सुविधा उपलब्ध करून देतोय.

सोफियाला म्युझियमलाही भेट द्यायची असेल तरी तिच्यासोबत बॉडीगार्डस् असतात. किडनॅपिंगचा धोका टाळता यावा, यासाठी तिचा मोबाईल नंबर प्रत्येक आठवड्याला बदलला जातो. 

सोफियाकडे तिची स्वत:ची एक बुलेट प्रुफ हमर गाडीही आहे. पार्टीसाठी ती वार्षिक जवळपास २ लाख युरो सहजच उडवते... यात तिचे मित्र-मैत्रिणी मोठ्या आनंदानं सहभागी होतात.

याशिवाय सोफियाला घोडेस्वारीचाही छंद आहे. तिच्याकडे बग्सी आणि रेनबो नावाचे दोन घोडे आहेत. यांची किंमत जवळपास ३ करोड रुपये आहे.