जिओ सिम खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, १५ मिनिटात होईल सिम अॅक्टीव्ह

 रिलायन्स जिओ ४जी सेवा सुरू झाली आता काही निवडक हँडसेटवर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. 

Updated: Sep 7, 2016, 08:24 PM IST
जिओ सिम खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, १५ मिनिटात होईल सिम अॅक्टीव्ह title=

नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ ४जी सेवा सुरू झाली आता काही निवडक हँडसेटवर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. 

त्यामुळे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की जिओची ही सेवा कशी सुरू होईल. तर पाहा या प्रश्नांची उत्तरे...

कुठून मिळेल रिलायन्स जिओचे सिम 

रिलायन्स जिओचे सिम तुम्ही रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि रिलायन्स डिजिटल एक्स्प्रेस मिनी स्टोअरमधून खरेदी करू शकतात. तसेच तुम्ही शहरातील काही रिटेल स्टोअर हे कार्ड खरेदी करू शकतो. तसेच जिओ.कॉमवर जाऊन फाइड ए स्टोअर टॅबवर क्लिक करून माहिती घेऊ शकतो. 

सिम अॅक्टिव्हिशनसाठी दस्तऐवज

रिलायन्स जिओच्या लॉन्चिंगवेळी उद्योगपती मुकेश अंबानी सांगितले होते की जिओ स्टोअरमध्ये केवळ १५ मिनिटात रिलायन्स जिओ सिमला अॅक्टी करता येणार आहे. आधारकार्ड नसेल तर अॅड्रेस प्रुफ, फोटो आयडी कार्ड किंवा पासपोर्टच्या आधारावर तुम्ही कार्ड घेऊन शकतात. या सर्व दस्ताऐवजांची एक एक फोटो कॉपी तुम्हांला द्यावी लागणार आहे. या नंतर रिलायन्स जिओचे एक अॅग्रीमेंट भरावे लागणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिलायन्स जिओचे सिम तुम्हांला मिळू शकते. 

ई-केवायसी मार्फत सिम कार्ड

तुमच्याकडे आधारकार्ड क्रमांक असेल तर ई-केवायसीमार्फत रिलायन्स जिओ मिळू शकते. यासाठी केवळ तुम्हांला आधार क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर फिंगर प्रिंट स्कॅन करून सर्व डेटाबेस मिळणार आहे.