भारतात ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार आयफोन 7

अॅपलचा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचं लॉन्चिंग अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी केलं.

Updated: Sep 8, 2016, 07:17 PM IST
भारतात ऑक्टोबरमध्ये लॉन्च होणार आयफोन 7 title=

मुंबई : अॅपलचा आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचं लॉन्चिंग अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी केलं. जगभरामध्ये या फोनच्या बुकिंगला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बुकिंगनंतर एका आठवड्यात आयफोन ग्राहकांना पोहोचवण्यात येणार आहे. 

भारतात मात्र हे दोन्ही फोन 7 ऑक्टोबरला लॉन्च करण्यात येणार आहेत. भारतातली याची किंमत 60 हजारांपासून पुढे असणार आहे. 

काय आहेत आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचे फिचर्स

- हेडफोन जॅक हटवण्यात आलाय. आता चार्जिंग प्लगमध्येच इअरफोन

- आयफोन ७ आणि ७ प्लस पहिले स्टिरिओ स्पीकर आयफोन आहेत. 

- ड्युएल सेटअप कॅमेऱ्यात वाईड अँगलसाठी एक लेन्स आणि दुसरा टेलिफोटो क्वालिटीसाठी देण्यात आलेत. 

- आयफोन ७ मध्ये १X वरून वाढवून १०X पर्यंत झूम करता येऊ शकेल.

- ७ मेगापिक्सलचा एचडी फ्रंट कॅमेरा 

- १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा

- आयफोन ७ आणि ७ प्लस दोघेही डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट असतील. 

- काळ्या रंगात हा फोन लॉन्च करण्यात आलाय. 

- आयफोन ७ ची बॉडी अॅल्युमिनिअमची असेल