भारताच्या विजयानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा धुमाकूळ

मुंबई : बुधवारी झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात भारताचा अगदी शेवटच्या क्षणी विजय झाला.

Updated: Mar 24, 2016, 11:35 AM IST
भारताच्या विजयानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा धुमाकूळ title=

मुंबई : बुधवारी झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात भारताचा अगदी शेवटच्या क्षणी विजय झाला. महेंद्रसिंग धोनीसोबतच हार्दिक पांड्याने कमाल केली. या अटीतटीच्या सामन्यात झालेल्या विजयानंतर व्हॉट्सअॅपवर रात्रीपासून विनोदी मॅसेजचा पाऊस पडतोय. यातील काही धमाकेदार मॅसेज झी २४ च्या प्रेक्षकांसाठी

***

"ब्रेकिंग न्यूज

धोनीचे हार्दिक पांड्यासाठी काय होते शेवटचे शब्द?

'नेहराने जे काय सांगितलं त्यातलं काहीही ऐकू नकोस'"

***

"शेवटच्या ओव्हर मध्ये स्वतः अर्ध ज्ञानी असूनही हार्दीक पांड्याला बॉलिंग शिकविल्या बद्दल गुरू "आशिष नेहरा" यांची "द्रोणाचार्य पुरस्कारा" साठी शिफारस. . . ."

 

***
"अनुष्का विराटला - अरे... हार्दिक चा नंबर दे ना

अनुष्का:  हाई पांड्या

पांड्या:  ताई आत्ताच करिअर सुरू झालं आहे"

***

"ऐकलं का??
.
.
.
.
.
बांग्लादेश मॅच रिेचेकिंगला टाकणार आहे म्हणे!!!"

***

"एक रन... एक रन आदमी को बांग्लादेश बना देता है"