२० सेकंदात विकले गेले ९५ हजार स्मार्टफोन

चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेईकोच्या लेई१एस स्मार्टफोनच्या दुसऱ्या सेलला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. याआधी कंपनीने फ्लॅश सेलमध्ये अवघ्या दोन सेकंदात ७० हजार स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केला होता. 

Updated: Feb 11, 2016, 02:03 PM IST
२० सेकंदात विकले गेले ९५ हजार स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लेईकोच्या लेई१एस स्मार्टफोनच्या दुसऱ्या सेलला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. याआधी कंपनीने फ्लॅश सेलमध्ये अवघ्या दोन सेकंदात ७० हजार स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा कंपनीने केला होता. 

त्यानंतर दुसरा फ्लॅश सेल मंगळवारी १२ वाजता सुरु झाला आणि अवघ्या २० सेकंदात ९५ हजार लोकांनी खरेदी केला. १७ फेब्रुवारीला कंपनी तिसरा फ्लॅश सेल घेऊन येणार आहे. 

कंपनीने या स्मार्टफोनची किंमत अवघी १० हजार ९९९ इतकी ठेवल्याने ग्राहकांची या स्मार्टफोननला मोठी पसंती मिळतेय. तब्बल ६.०५ लाख लोकांनी या स्मार्टफोनसाठी रजिस्ट्रेशन केले होते. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची जबरदस्त विक्री होतेय.