एचटीसीच्या 'एम १०' स्मार्टफोनचे फिचर्स लीक

तैवानची मोबाईल निर्माता कंपनी 'एचटीसी'चा एम १० हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 11, 2016, 01:40 PM IST
एचटीसीच्या 'एम १०' स्मार्टफोनचे फिचर्स लीक  title=

मुंबई : तैवानची मोबाईल निर्माता कंपनी 'एचटीसी'चा एम १० हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये  ५.२ इंचाचा हाय डेफिनेशन डिस्प्ले असेल. याचं रिझॉल्युशन २५६० X १४४० पिक्सल असेल... तसंच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८२० चिपसेट प्रोसेसर आणि ४ जीबीचा दमदार रॅम असेल. 

उल्लेखनीय म्हणजे, यात ३२ जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आलंय. तर यामध्ये ६.० मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम असेल असं सांगण्यात येतंय. यामध्ये, ३००० मेगाहर्टझची बॅटरी असेल.  

फोटोग्राफीसाठी १२ अल्ट्रा मेगापिक्सल कॅमेरा असेल. यात ऑटोफोकस आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबलायझेशनसारखे फिचर्स असतील. शिवाय, याचा सेल्फी कॅमेराही ऑप्टिकल इमेज स्टॅबलायझेशनसहीत असेल.

हा स्मार्टफोन वॉटर आणि डर्ट रेसिस्टंट असेल. फिंगरप्रिंट स्कॅनरसारखी सुविधाही यात उपलब्ध असेल.