लिनोव्होनं भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन A2010

लिनोव्होनं आपला बजेट 4G स्मार्टफोन A2010 लॉन्च केलाय. हा भारतातील आतापर्यंतच सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ४,९९९ रुपये आहे.

Updated: Aug 20, 2015, 03:46 PM IST
लिनोव्होनं भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन A2010 title=

नवी मुंबई: लिनोव्होनं आपला बजेट 4G स्मार्टफोन A2010 लॉन्च केलाय. हा भारतातील आतापर्यंतच सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी ४,९९९ रुपये आहे.

लिनोव्हो A2010 एक्सक्लुझिव्हली ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल.  स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ३ सप्टेंबरपासून संध्याकाळी ३ वाजता सुरू होईल आणि यासाठी आज रजिस्ट्रेशन आपण करू शकता.

स्पेसिफिकेशनबाबत बोलणं झालं तर... लिनोव्हो A2010 स्मार्टफोन ४.५ इंचचा डिस्प्ले आहे. रिझॉल्यूशन 
480x854 आहे. प्रोसेसर 1GHz MediaTek MT6735m 64-bit quad core आहे. सोबत १ जीबी रॅम दिलीय. स्मार्टफोनची इनबिल्ट स्टोरेज मेमरी ८ जीबी आहे. मायक्रोएसडी कार्डसह ३२ जीबी पर्यंत वाढेल. लिनोव्हो A2010मध्ये ५ मेगापिक्सेल रिअस कॅमेरा, फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल आहे.

A2010 एक ड्युअल सिम (GSM+GSM) स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. लिनोव्हो A2010मध्ये ब्लूटूश 4.0LE, वाय फाय, एफ एम रेडिओ आणि ४जी कनेक्टिव्हिटी फीचर आहे. हँडसेट 2000 mAhच्या रिप्लेसेबल बॅटरीसोबत उपलब्ध असेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.