तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन भारतात लॉन्च

लिनोव्हो कंपनीने आपला पी 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.  या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. 

Updated: Jan 11, 2017, 11:41 PM IST
तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन भारतात लॉन्च

मुंबई : लिनोव्हो कंपनीने आपला पी 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.  या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. 

या फोनची वैशिष्ट्ये

-  5100 मिलीअँपिअर बॅटरी क्षमता 
- 15 मिनिटांमध्ये दहा तासांपर्यंत चालण्याइतपत बॅटरी चार्ज
- दोन व्हेरिएंट्समद्ये हा फोन उपलब्ध 
- 3 GB रॅम असलेल्या 
- फोनची किंमत 16,999 तर 4  GB रॅम असलेल्या फोनची किंमत 17,999 
- आज मध्यरात्रीपासून हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी 
- फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी असून मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी  128 जीबीपर्यंत वाढवू शकता
- अँड्रॉईडच्या मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट - क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन या प्रोसेसरवर आधारीत 
- फोनमध्ये 13 आणि 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे
- फोनला 5.5 इंच फुल एचडी स्क्रीन 
-1920 बाय 1080 पिक्सल्स क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले