फेसबुकसारखे 'लाईक' फीचर व्हॉट्स अॅपवर?

फेसबुकवरील लाईकचं फीचर सगळ्यांना माहित असेलचं. हेचं फिचर आता व्हॉट्स अॅपवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फेसबुकवरील लाईक तसेच मार्क अॅज अनरिड ही दोन्ही फिचर्स व्हॉट्स अॅपवर मिळणार आहे. 

Updated: Jul 21, 2015, 02:01 PM IST
फेसबुकसारखे 'लाईक' फीचर व्हॉट्स अॅपवर? title=

मुंबई : फेसबुकवरील लाईकचं फीचर सगळ्यांना माहित असेलचं. हेचं फिचर आता व्हॉट्स अॅपवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फेसबुकवरील लाईक तसेच मार्क अॅज अनरिड ही दोन्ही फिचर्स व्हॉट्स अॅपवर मिळणार आहे. 

फेसबुकने व्हॉट्स अॅपला खरेदी केल्यामुळे हे फिचर्सव्हॉट्स अॅपवर येण्याची शक्यता वाढली आहे.  फेसबुकने व्हॉट्स अॅपला खरेदी केल्यानंतर विशेष बदल करण्यात आले नव्हते. पण आता हे बदल होतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

व्हॉट्स अॅपचे लवकरचं नवीन स्वरूपात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता फेसबुकवरील फिचर्स व्हॉट्स अॅपवर दिसले, तर नवल वाटायला नको.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.