मायक्रोमॅक्सचा धमाका, ४जी स्मार्टफोन ८ हजारांच्या आत उपलब्ध

भारतीय मायक्रोमॅक्सने कमी किमतीत ४जी स्मार्टफोन ऑनलाईनवर उपलब्ध होत आहे. आजपासून हा फोन स्नॅपडीलवर विक्री करण्यात येत आहे.

Updated: May 10, 2016, 06:39 PM IST
मायक्रोमॅक्सचा धमाका, ४जी स्मार्टफोन ८ हजारांच्या आत उपलब्ध title=

मुंबई : भारतीय मायक्रोमॅक्सने कमी किमतीत ४जी स्मार्टफोन ऑनलाईनवर उपलब्ध होत आहे. आजपासून हा फोन स्नॅपडीलवर विक्री करण्यात येत आहे.

स्नॅपडीलवर कॅन्व्हास एक्सपी हा फोन विक्रीसाठी सादर करून आम्ही ग्राहकांना शक्तिशाली ४जी स्मार्टफोन उपलब्ध करून देत असल्याचे मायक्रोमॅक्सचे मुख्य विपणन अधिकारी शुभजीत सेन यांनी सांगितले. 

काय आहे या फोनमध्ये?

५ इंचाचा एचडी स्क्रिन असलेल्या या फोनमध्ये १ गेगाहर्टस् क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ३जीबी रॅम आणि १६ जीबीची अंतर्गत मेमरी आहे. हा फोन अवघ्या ७४९९ रुपये किंमतीचा कॅन्व्हास एक्सपी उपलब्ध आहे. यात इनबिल्ट ४जी तंत्रज्ञान आहे.  

यात रिअर ८ मेगापिक्सल आणि फ्रंट २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. अॅण्ड्रॉइड ५.१ लॉलीपॉप प्रणालीवर चालणार आहे. या स्मार्टफोनमध्ये २००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.