...ही आहे जगातील सर्वात सुंदर दिसणारी गाडी!

नवी दिल्ली : आलिशान गाड्या बनवणारी 'जॅग्वार' कंपनी आता अशी एक गाडी घेऊन आलीय जी काहींच्या मते जगातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. एफ टाईप कुपे प्रकारातील ही गाडी आहे.

Updated: Jan 16, 2016, 06:30 PM IST
...ही आहे जगातील सर्वात सुंदर दिसणारी गाडी! title=

नवी दिल्ली : आलिशान गाड्या बनवणारी 'जॅग्वार' कंपनी आता अशी एक गाडी घेऊन आलीय जी काहींच्या मते जगातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. एफ टाईप कुपे प्रकारातील ही गाडी आहे.

सुंदर दिसण्यासोबतच यात अनेक धमाकेदार फिचर्स आहेत. जबरदस्त पावरफूल इंजिन असलेली ही गाडी फक्त ५.३ सेकंदात तब्बल १०० किमी प्रती तास इतका वेग गाठू शकते. या गाडीचा टॉप स्पीड २६० किमी प्रती तास इतका आहे.

ही गाडी साधारण १० किमी प्रती लीटर इतका मायलेज देते. कंपनीने यात ७० लीटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे.

एफ टाईप कुपे 

गाडीच्या डॅशबोर्डवर आठ इंचाची डिस्प्ले स्क्रीन असून सीट्सना लेदर कव्हर्स आहेत. ही गाडी सात रंगांत उपलब्ध आहे. या गाडीत स्पोर्टस् सस्पेन्शन ब्रेकस् आहेत.

या गाडीत सामान ठेवायलाही बरीच जागा आहे. याचे LED सिग्नेचर लाईट्स या गाडीची शोभा वाढवतात.

पण ही गाडी तुम्हाला तितकीच शानदार किंमतही मोजावी लागेल. भारतात या गाडीची किंमत १.२६ कोटी रुपये इतकी आहे.