जिओला बीएसएनएलनंतर एमटीएनएल देणार टक्कर, 319 रुपयांत 2 जीबी डेटा

सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये 'प्राइस वॉर'मध्ये सुरु आहे. आता यात एमटीएनएलनेही उडी घेतली आहे. ही सरकारी कंपनी 1 एप्रिलपासून 319 रुपयांचा एक प्लॅन सुरू करत आहे.. त्यात ग्राहकांना दररोज थ्रीजी स्पीडने 2 जीबी डेटा वापरता येईल आणि एमटीएनएल नेटवर्कवर कितीही वेळ मोफत कॉलिंग करता येईल.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 31, 2017, 11:41 PM IST
जिओला बीएसएनएलनंतर एमटीएनएल देणार टक्कर, 319 रुपयांत 2 जीबी डेटा title=

मुंबई : सध्या मोबाईल कंपन्यांमध्ये 'प्राइस वॉर'मध्ये सुरु आहे. आता यात एमटीएनएलनेही उडी घेतली आहे. ही सरकारी कंपनी 1 एप्रिलपासून 319 रुपयांचा एक प्लॅन सुरू करत आहे.. त्यात ग्राहकांना दररोज थ्रीजी स्पीडने 2 जीबी डेटा वापरता येईल आणि एमटीएनएल नेटवर्कवर कितीही वेळ मोफत कॉलिंग करता येईल.

आपल्या31व्या वाढदिवसानिमित्त एमटीएनएलने हा नवी योजना आणली आहे. रिलायन्स जिओच्या मोफत सेवेला मिळालेल्या चांगला प्रतिसाद लक्षात घेता सरकारी कंपनी बीएसएनएलने ही नवी योजना लागू केली आहे. आता दुसरी सरकारी कंपनी एमटीएनएलने उद्यापासून नवी योजना आणली आहे.

जिओच्या 'प्राइम मेंबर' न झालेले ग्राहकांसाठी जिओने 15 एप्रिलची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे स्पर्धेत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. व्होडाफोनने आपल्या ग्राहकांना तीन महिन्यांचा 4 डाटा मोफत उपलब्ध करुन दिला आहे.

आता एमटीएनएलचा प्लान ३१९ रुपयांचा असेल. त्यात 28 दिवस रोज 2 जीबीपर्यंत डेटा वापरता येणार आहे. एमटीएनएल क्रमांकावर केलेले कॉल पूर्णपणे मोफत असतील. तर इतर नेटवर्कवरही 25  मिनिटांपर्यंत मोफत बोलता येईल. ही 25 मिनिटं संपल्यानंतर 25 पैसे प्रती मिनिट या दराने पैसे लागणार आहेत.