मोबाईलची बॅटरी ८ दिवस चालणार

मूळची इंग्लंडची एक कंपनी मोबाईलसाठी इंधनावर चालणारी बॅटरी बनवत आहे,  यामुळे तुमच्या सेलफोनची बॅटरी आठवडाभर चालण्यास मदत होणार आहे. लिथिअम-आयन बॅटरीला मर्यादा आहेत, त्यामुळे फ्यूल बॅटरी बनवण्यावर ही कंपनी भर देत आहे.

Updated: Feb 10, 2016, 09:25 PM IST
मोबाईलची बॅटरी  ८ दिवस चालणार title=

मुंबई : मूळची इंग्लंडची एक कंपनी मोबाईलसाठी इंधनावर चालणारी बॅटरी बनवत आहे,  यामुळे तुमच्या सेलफोनची बॅटरी आठवडाभर चालण्यास मदत होणार आहे. लिथिअम-आयन बॅटरीला मर्यादा आहेत, त्यामुळे फ्यूल बॅटरी बनवण्यावर ही कंपनी भर देत आहे.

हायड्रोजन फ्लूल सेल हे  रासायनिक अभिक्रेयच्या माध्यमातून उर्जा तयार करतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगातून उर्जा तयार होते. म्हणून नवीन आठवड्याभर चालणारी बॅटरी ही हायड्रोजन  सेल पॉवरच्या माध्यमातून बनवली जाणारी आहे.