भारताच्या 45 टक्के 3जी डिव्हाईसमध्ये 3जी उपयोग नाही - नोकिया

एकीकडे भारतीय टेलिकॉम कंपन्या देशात '3जी'नंतर आता 4जी सर्व्हिस सुरू करत आहेत. तर दुसरीकडे एका रिसर्चमध्ये पुढे आलंय की, देशातील अर्ध्याहून अधिक 3जी स्मार्टफोनमध्ये 3जी इंटरनेटचा वापर केला जात नाही.

Updated: Nov 8, 2015, 04:22 PM IST
भारताच्या 45 टक्के 3जी डिव्हाईसमध्ये 3जी उपयोग नाही - नोकिया  title=

मुंबई: एकीकडे भारतीय टेलिकॉम कंपन्या देशात '3जी'नंतर आता 4जी सर्व्हिस सुरू करत आहेत. तर दुसरीकडे एका रिसर्चमध्ये पुढे आलंय की, देशातील अर्ध्याहून अधिक 3जी स्मार्टफोनमध्ये 3जी इंटरनेटचा वापर केला जात नाही.

आणखी वाचा - व्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा!

नोकिया नेटवर्क्सद्वारे केलेल्या या रिसर्चमधून खुलासा झालाय की, देशात मोबाइल नेटवर्कशी जोडलेले जवळपास 25 टक्के डिव्हाइस 3जी सपोर्ट करणारे आहेत आणि यातील 45 टक्के स्मार्टफोनचा वापर 3जी सर्व्हिससाठी होतो. मात्र या सर्व्हेत हे सुद्धा सांगितलंय की ग्राहक 3जी सर्व्हिसकडे आकर्षित होत आहेत.

या रिसर्चनुसार सहा महिन्यांमध्येच 3जी यूजर्सची संध्या 26 टक्क्यांनी वाढलीय. तर भारतात याची डेनसिटी जवळपास 24.59 टक्के आहे.

आणखी वाचा - व्हॉटस अॅपने दिलंय, एक नवं ऑप्शन

नोकिया नेटवर्क्सच्या टेक्नॉलॉजी प्रमुख अमित मारवाह यांनी सांगितलं की, दूरसंचार कंपन्यांसाठी या क्षेत्रात खूप काही करण्यासारखं आहे. या शोधानुसार मोबाईल नेटवर्क्सच्या 65 कोटी ग्राहकांमधून 1.48 कोटी लोकांजवळ आता 4जी डिव्हाईस आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.