रिलायन्स जिओ देणार आणखीन एक गुड न्यूज?

रिलायन्स जिओ प्राईम सबस्क्रिप्शनसाठी 31 मार्च 2017 पर्यंत मुदत देण्यात आलीय. परंतु, कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांनी जिओ प्राईम सबस्क्रिप्शनकडे वळावं, यासाठी आणखीन मुदत वाढवून देऊ शकते. 

Updated: Mar 25, 2017, 11:09 PM IST
रिलायन्स जिओ देणार आणखीन एक गुड न्यूज? title=

मुंबई : रिलायन्स जिओ प्राईम सबस्क्रिप्शनसाठी 31 मार्च 2017 पर्यंत मुदत देण्यात आलीय. परंतु, कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांनी जिओ प्राईम सबस्क्रिप्शनकडे वळावं, यासाठी आणखीन मुदत वाढवून देऊ शकते. 

'टेलीअॅनालिसिस'च्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ प्राईमसाठी अपेक्षित असा उत्साह ग्राहकांमध्ये दिसून आलेला नाही. रिलायन्सच्या अपेक्षेनुसार, आत्तापर्यंत 2.20 ते 2.70 करोड ग्राहक जिओ प्राईमसाठी नोंदणी करू शकतात. परंतु, असं झालं नाही... आणि कंपनीच्या अपेक्षा फोल ठरल्या.

त्यामुळेच जिओ प्राईम सबस्क्रिप्शन घेण्यासाठी ही मुदत वाढविण्यात येऊ शकते. ही मुदत 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात येऊ शकते.