स्वत:ला अपडेट करणारा 'रोबो ब्रेन', मानवी बुद्धीला आव्हान

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक असा रोबोट ब्रेन बनवलाय जो इंटरनेटच्या लाखों वेब पेजवर जाऊन नवीन माहिती गोळा करून स्वतःला शिक्षित करू शकतो. 

Updated: Aug 28, 2014, 07:48 PM IST
स्वत:ला अपडेट करणारा 'रोबो ब्रेन', मानवी बुद्धीला आव्हान

मुंबई : अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक असा रोबोट ब्रेन बनवलाय जो इंटरनेटच्या लाखों वेब पेजवर जाऊन नवीन माहिती गोळा करून स्वतःला शिक्षित करू शकतो. 

हा रोबो ब्रेन अशा प्रकारे बनवला आहे की तो सार्वजनिक रूपात उपलब्ध असलेल्या माहितीवरून अनेक कला आणि ज्ञान आत्मसात करू शकतो... आणि स्वत:च स्वत:ला अपडेट करू शकतो. जगातल्या इतर भागांत असलेले रोबोट आपलं दैनंदिन काम करण्यासाठी या रोबो ब्रेनच्या सूचनांचा वापर करू शकता.

याच प्रकारचा, 'रोबो अर्थ' नावाचा  एक प्रकल्प युरोपमध्ये याआधीच सुरू झालाय. नेदरलँडमध्ये याचं प्रदर्शनही भरवलं गेलं होतं.

या रोबोअर्थचा माहितीचा स्त्रोत प्रोग्रामिंग आहे. हा रोबोअर्थ इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीतूनच स्वत:ला अपडेट करतो. 

रोबो ब्रेन प्रोजेक्टवर अमेरिकेचे कॉर्नेल, ब्राउन, स्टॅनफोर्ड आणि कॅलिफोर्निया हे चार विश्वविद्यालय एकत्रित काम करत आहेत. या कामात त्यांना गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्याही मदत करत आहेत..

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, 'मागील महिन्यात जवळपास एक अरब फोटो, एक लाख 20 हजार यू-ट्यूब व्हिडिओ आणि 10 करोड़ उपकरणाच्या मॅन्युअलची हाताळणी या रोबोनं सुरूवात केलीय'.

या प्रोजेक्टच्या वेबसाईटवर याबद्दल माहिती दिली गेलीय.  त्यामध्ये, हा रोबो खुर्ची  आणि माइक्रोवेव्ह आणि छत्री यांमधील फरक समजण्यासही सक्षम असल्याचं म्हटलंय. 

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, 'रोबो ब्रेन फक्त वस्तुंनाच ओळखतो असं नाही तर त्याच्यात माणसाच्या भाषा आणि व्यवहार समजण्याचीदेखील क्षमता आहे. एखादा व्यक्ती जर टीव्ही बघत असेल तर टीव्हीच्या समोर येऊ नये, याची माहितीही या रोबोला आहे...  

कॉर्नेल विश्वविद्यालयाचे वैज्ञानिक आशुतोष सक्सेना यांच्या म्हणण्यानुसार, 'जर एखादा रोबो एका अशा स्थितीत फसला की ज्याचा सामना याआधी त्या रोबोने कधीच केला नाही तर अशा स्थितीत तो रोबो ब्रेन सोबत याविषयी चर्चा करु शकतो'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.