महिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं

महिलांच्या काही रहस्यमय गोष्टी आहेत, महिलांचं मन कुणालाही वाचता येत नाही असंही म्हणतात, पण महिलांच्या मनात सर्वच वाईट असतं असाही गैरसमज करून घेऊ नका, महिलांना त्यांना त्यांच्या रंगात जगायला आवडतं, जे सामाजिक दबावामुळे किंवा सर्वांसमोर त्यांना जे करता येत नाही, पण जे सतत मनात रूंजी घालत असतं अशा गोष्टी त्या एकट्या असतांना करतात.

Updated: Sep 2, 2015, 02:23 PM IST
महिलांच्या मनातील काही रहस्य आणि गुपितं title=

मुंबई : महिलांच्या काही रहस्यमय गोष्टी आहेत, महिलांचं मन कुणालाही वाचता येत नाही असंही म्हणतात, पण महिलांच्या मनात सर्वच वाईट असतं असाही गैरसमज करून घेऊ नका, महिलांना त्यांना त्यांच्या रंगात जगायला आवडतं, जे सामाजिक दबावामुळे किंवा सर्वांसमोर त्यांना जे करता येत नाही, पण जे सतत मनात रूंजी घालत असतं अशा गोष्टी त्या एकट्या असतांना करतात.

महिलांच्या मनात अनेक गुपितं असतात, अशीच काही साधीसुधी गुपितं

पुरुषांना न्याहाळण्याची सवय 
पुरूषच महिलांना पाहतात, न्याहाळतात असं नाही, तर महिला देखील पुरूषांना न्याहाळतात, पण आपण पाहतोय हे कुणाला कळू नये, याची ते जास्त काळजी घेतात. महिला आपल्या यापूर्वी प्रियकराला जास्त न्याहाळतात, त्याची सध्याची मैत्रिण आपल्यापेक्षाही सुंदर आहे का? हे जाणून घेण्याचा त्याचा सर्वात जास्त प्रयत्न असतो.

एक्सप्लोर करणे 
महिला एकट्या आणि रिकाम्या असल्याच की त्यांनी त्यांची बॉडी एक्स्प्लोर करायला आवडते,  यात तासनतास आरशासमोर उभे राहून स्वत:ला पाहणे तर आलेच, शरीराची स्तुती करण्यातही त्यांना आनंद असतो.

स्टायलिश महिलांची कॉपी 
महिला दुसऱ्या महिलेला पाहून जळतात,असं तुम्हाला वाटतही असेल, पण ते काही प्रमाणातच सत्य असावं, कारण महिला एकमेकांचं स्टाईल स्टेटमेंट न्याहाळतात, समजून घेतात, आणि आवडलं तर ते स्टाईल फॉलो करण्याचा प्रयत्न करतात.

पॉर्न पाहणे आवडते पण...
सर्वच महिलांना पॉर्न पाहणे आवडते असं म्हणता येणार नाही, पण ज्या महिलांना पॉर्न पाहणं आवडतं ते सर्वांसमोर हे चुकूनही कबुल करत नाहीत, किंवा त्यांनी पॉर्न पाहिलंय यापूर्वी असा एक मागमूसही चेहऱ्यावर दिसत नाही.

संशयीवृत्ती सामान्य गुणधर्म....
महिला या आपल्या नवऱ्यावर संशय घेतात, त्या संशयी असतात हा देखील एक गैरसमज म्हणावा लागेल, पण महिला संशयी असतात आणि नसतातही कारण त्या नेहमीच आपला साथीदार काय करतोय याची माहिती घेत असतात, ते नेहमीच पडताळणी करत असतात. आपण त्याला संशय म्हणतो. 

आई होणे आवडते पण...
महिलांना आई होणं आवडतं पण लग्नानंतर लगेच आई होणे आवडत नाही, त्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं, प्रेग्नेंसी आणि मासिक पाळीचा त्रास फक्त महिलांच्याच वाटेला का असा प्रश्नही त्यांच्या मनात सारखा येत असतो.

एकट्या घरी असतांना त्यांचा रंगच वेगळा
महिला घरी एकट्या असतांना आपल्याच रंगात रंगलेल्या असतात. महिला एकट्या असताना अशा गोष्टी करणे पसंत करतात , ज्या गोष्टी त्या घरी कोणी असताना करू शकत नाहीत. तुम्ही विश्वास करणार नाही कधी-कधी या गोष्टी खूपच आश्चर्यकारक असतात. जसे आरशासमोर नृत्य करणे तसेच वेगवेळ्या पोजमध्ये फोटोसेशन करणे आदी गोष्टी सामिल आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.