लंडन : मनुष्य प्राणी पुढील ५० वर्षांनंतर रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल, ही सामान्य गोष्ट असेल असा दावा एका एक्सपर्टने केला आहे.
डॉ. हेलेन ड्रिस्कोल यांनी सांगितले की, सध्या मनुष्य रोबोट तंत्रज्ञानात जशी प्रगती करत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहे. ते पाहता आगामी भविष्यात हे चित्र खूप बदलण्याची शक्यता आहे.
सेक्स आणि रिलेशनशीप मानसशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. हेलेन ड्रिस्कोल म्हणाल्या, 'सेक्स टेक' तंत्रज्ञान २०७० मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मनुष्य रोबोटशी शारिरीक संबंध निर्माण करेल आणि हे खूप सामन्य असणार असल्याचे आजच्या युगातील धक्कादायक विधान केले आहे.
सध्या मॅनिक्विन पार्टनर ऑनलाइन मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढील काही वर्षात रोबोट, किंवा संवाद साधणारे, मोशन सेन्सिंग टेक्नॉलॉजी हे 'सेक्स' संदर्भात वापरण्यात येतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.