व्हॉटस अॅपवर काही लिंक ब्लॉक

ई-कॉमर्समध्ये व्हॉटस अॅपचा दबदबा असताना, व्हॉटस अॅपने टेलिग्राम सोबत खिलाडू वृत्ती दाखवायला हवी होती, ती व्हॉटस अॅप दाखवत नाहीय, यावरून व्हॉटस अॅपला स्पर्धक टेलिग्रामची चांगलीच भीती असल्याचं दिसून येत आहे.

Updated: Dec 1, 2015, 07:33 PM IST
व्हॉटस अॅपवर काही लिंक ब्लॉक title=

मुंबई : ई-कॉमर्समध्ये व्हॉटस अॅपचा दबदबा असताना, व्हॉटस अॅपने टेलिग्राम सोबत खिलाडू वृत्ती दाखवायला हवी होती, ती व्हॉटस अॅप दाखवत नाहीय, यावरून व्हॉटस अॅपला स्पर्धक टेलिग्रामची चांगलीच भीती असल्याचं दिसून येत आहे.

लिंक ब्लॉक करून स्पर्धा करणे योग्य आहे का?
कारण अँड्रॉईड फोनवर टेलिग्रामच्या येणाऱ्या लिंक ब्लॉक होत आहेत, व्हॉटस अॅपचं नवीन अपडेटेड स्वरूप 2.12.367 मध्ये, टेलिग्राममधून पाठवलेली लिंक ब्लॉक होते, ती ओपन होत नाही, सब डोमेन डॉट टेलिग्रामने सुरू होणाऱ्या लिंक व्हॉटस अॅप ब्लॉक करतंय.

असं होणं अपेक्षित नाही
व्हॉटस अॅपकडून असं होणं अपेक्षित नाहीय, कारण व्हॉटस अॅपची मालकी आता फेसबुककडे आहे, फेसबुकची लिंक ट्वीटर ब्लॉक करत नाही, किंवा यू-ट्यूब व्हिडीओची लिंक फेसबुकवर ब्लॉक झाली तर काय हंगामा होईल, असाचं टेलिग्राम आणि व्हॉटस अॅपचा प्रकार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.