एटीएमचा पासवर्ड का असतो फक्त 4 डिजीटचा

जगभरात आज पैसे काढण्यासाठी एटीएम मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आपण फक्त आपलं एटीएम कार्ड स्वाईप करून कधीही पैसे काढतो. पण तुम्हांला हा प्रश्न पडला असेल की तुमच्या एटीएमचा फक्त 4 डिजीट नंबर तुमचं अकाऊंट कसा सुरक्षित ठेऊ शकतो.

Updated: Dec 1, 2015, 07:00 PM IST
एटीएमचा पासवर्ड का असतो फक्त 4 डिजीटचा title=

मुंबई : जगभरात आज पैसे काढण्यासाठी एटीएम मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आपण फक्त आपलं एटीएम कार्ड स्वाईप करून कधीही पैसे काढतो. पण तुम्हांला हा प्रश्न पडला असेल की तुमच्या एटीएमचा फक्त 4 डिजीट नंबर तुमचं अकाऊंट कसा सुरक्षित ठेऊ शकतो.

आपलं ई-मेल अकांऊट असलं तरी त्याला कमीत कमी 6 अंकाचा पासवर्ड मागितला जातो. पण फक्त 4 अंकाचा एटीएम पासवर्ड तुमचे पैसे कसे सुरक्षित ठेवू शकतो. हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

एटीएम मशीनचा शोध हा 1967 मध्ये जॉन अॅडरिअन या स्कॉटीश व्यक्तीने लावला. ज्यावेळेस त्याने या मशीन शोध लावला त्यावेळेस त्याचा पासवर्ड हा 6 डिजीटच ठेवण्यात आला होता. पण जॉनच्या पत्नीने 6 अंकी पासवर्डला असहमती दर्शवली कारण तो तिच्या लक्षात राहत नव्हता.

जॉनने आपल्या पत्नीचं मत ऐकल्यानंतर त्याने महिलांचा विचार करत पासवर्डची संख्या 6 ऐवजी 4 अंकीच ठेवण्याचा निर्णय घेतला. हिच होती एटीएमच्या 4 अंकी पासवर्ड मागची मनोरंजक कहाणी.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.