...आणि 'ट्विटर'वासिय भांबावले!

सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटर सोमवारी काही वेळासाठी ठप्प झालं... आणि त्यामुळे काही काळ नेटिझन्स भांबावलेले दिसले. 

Updated: Jan 19, 2016, 10:23 AM IST
...आणि 'ट्विटर'वासिय भांबावले! title=

नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटर सोमवारी काही वेळासाठी ठप्प झालं... आणि त्यामुळे काही काळ नेटिझन्स भांबावलेले दिसले. 

जवळपास १० मिनिटांपर्यंत ट्विटर बंद पडलं. ही गडबड लगेचच दूर करण्यात आली. परंतु, याबद्दल कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. 

कंपनीनं, एका ब्लॉग पोस्टमध्ये, भारतीय वेळेनुसार रात्री ७.५२ पासून ८.०३ पर्यंत काही यूझर्सना साईट ओपन करताना काही अडचणी जाणवल्या, असं म्हटलंय.