पैसे न भरता अॅडवान्स टॉकटाईम, इंटरनेट रिचार्ज देतेय ही कंपनी

एकीकडे ५०० आणि १००० च्या रद्द झाल्याने लोकं बँकांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा कोणीच घेत नाही आहेत. सरकारी कार्यालय सोडल्या तर सध्या त्या कोणीच तुमच्याकडून घेणार नाहीत. अनेकांना या गोष्टीचा त्रास होतोय. पैसे सुट्टे नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतोय. पण असं असतांनाच वोडाफोनने एक नागरिकांना दिलासा दिला आहे.

Updated: Nov 11, 2016, 11:56 PM IST
पैसे न भरता अॅडवान्स टॉकटाईम, इंटरनेट रिचार्ज देतेय ही कंपनी title=

मुंबई : एकीकडे ५०० आणि १००० च्या रद्द झाल्याने लोकं बँकांमध्ये मोठी गर्दी करत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा कोणीच घेत नाही आहेत. सरकारी कार्यालय सोडल्या तर सध्या त्या कोणीच तुमच्याकडून घेणार नाहीत. अनेकांना या गोष्टीचा त्रास होतोय. पैसे सुट्टे नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतोय. पण असं असतांनाच वोडाफोनने एक नागरिकांना दिलासा दिला आहे.

वोडाफोनने त्यांच्या ग्राहकांना एक खास सुविधा देण्याचं ठरवलं आहे. वोडाफोन दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांच्या ग्राहकांना अॅडवांस टॉकटाइम आणि अॅडवांस इंटरनेट डेटा देत आहे. पोस्टपेड ग्राहकांसाठी ही सुविधा असणार आहे. या सुविधेनुसार पोस्टपेड ग्राहकांना बिल भरण्यासाठी ३ दिवसांचा वेळ वाढून देण्यात आला आहे. सध्या व्यवहारात इतर नोटांचा तुटवडा आहे. त्यामुळे वोडाफोनने हा निर्णय घेतला आहे.